Principal Suresh Gawde awarded “National Model Principal Award”.
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज आंबोलीचे माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना “राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार” जाहिर झाला असून रविवार दिनांक २६ रोजी हरमल- गोवा येथे केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते पुरस्कारचे वितरण होणार आहे.
सेवानिवृत्त प्रा. सुरेश गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३५ वर्षे अहोरात्र काम करून विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य केले. त्यांचे विद्यार्थी सैन्यामध्ये विविध उच्चपदावर तसेच विविध क्षेत्रामध्ये आज अभिमानाने कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कारांने सन्मानित केले आहे.