कालेलीतील जुन्या पिढीतील जेष्ठ नागरिक देऊ कालेलकर यांचे निधन

Google search engine
Google search engine

Deu Kalelkar, an old generation senior citizen of Kaleli, passed away

कणकवली : कुडाळ तालुक्यातील कालेली ( चव्हाणवाडी ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ नागरिक देऊ रामा कालेलकर ( वय 95 ) यांचे वृद्धापकाळाने ओरोस येथे 24 मार्च रोजी निधन झाले. कालेली येथील स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कालेली गावातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून दिवंगत देऊ परिचित होते. ओरोस जिल्हा न्यायालयातील कर्मचारी मंगेश यांचे ते वडील तर कालेली पोलीस पाटील गणेश कालेलकर , प्राथमिक शिक्षक हरिश्चंद्र कालेलकर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सुधाकर कालेलकर यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चत सुना, नातवंडे , नातसुना, पणतंवडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कालेली गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती हरपली असून शोक व्यक्त होत आहे.