न्हावेली माऊली मंदिर रस्ता ते पंचदेवी पार्सेकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

Asphalting of Nhaveli Mauli Mandir Road to Panchdevi Parsekarwadi Road commenced

सावंतवाडी । प्रतिनिधी : न्हावेली माऊली मंदिर रस्ता ते पंचदेवी पार्सेकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . न्हावेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पंचदेवी पार्सेकरवाडी हा रस्ता गेले कित्येक दिवस डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत होता . या संदर्भात या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा व मागणीही केली होती . त्याच्या या प्रयत्नाने रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्याला आता यश आल्याने सदर रस्त्याचा न्हावेली ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक, राजन कालवणकर, हेमचंद्र सावळ, अक्षय पार्सेकर, हेमंत मराठे , माजी सरपंच प्रतिभा गावडे , तात्या चौकेकर, समिर पार्सेकर, नितीन पालयेकर, सुंदर पार्सेकर, उदय पार्सेकर,शैलेश भगत, भाजप शक्तीप्रमुख संजय दळवी, दादा परब , दिपक नाईक ,भिवा नाईक गितेश परब , नारायण नाईक ,सुनिल धाऊसकर, आरती माळकर, स्नेहा पार्सेकर, निकिता परब ,एकनाथ परब , श्याम न्हावेलकर, तसेच ग्रामस्थ भाजप कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .