सावंतवाडी । प्रतिनिधी :
धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाच्यानिमित्त सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शाखा, शिवप्रेमी ग्रुप, आजगांव-धाकोरे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मळेवाड या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सावंतवाडी रक्तपेढी व एसएसपीएम रक्तपेढी, पडवे यांच्या सहकार्याने एकाच दिवशी एकाच वेळी दोन रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. छत्रपती शिवराय व धर्मवीर शंभुराजे यांच्या विचारांनी, ध्येयाने व धैर्याने प्रेरीत होऊन बहुसंख्य युवकांनी आणि महिलांनीही उत्साहपूर्ण वातावरणात मौलिक असे रक्तदान केले.
आजगांव येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आजगांव उपसरपंच सुशिल कामटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच सुप्रिया मेस्त्री, भोमवाडी सरपंच अनुराधा वराडकर, तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, पोलिसपाटील निकिता पोखरे, शिक्षक अनिल गोवेकर, वासुदेव (आना) सावंत, विठ्ठल केदार, संजय वाडकर, सावंतवाडी रक्तपेढीचे डाॅ. लादे, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते सदस्य पुरुषोत्तम (राजू) शेणई, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे आदी उपस्थित होते.
आठ दिवसांपूर्वीच गोवा-बांबुळी येथे अत्यवस्थ रुग्णासाठी आठ फ्रेश रक्तदात्यांची गरज असताना राजू शेणई यांनी आठ रक्तदात्यांना बांबुळी येथे नेऊन रुग्णाचा मौल्यवान जीव वाचविल्याबद्दल शिवप्रेमी ग्रुप तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी हा केवळ माझा सत्कार नसून तो माझ्या हाकेला धावून आलेल्या त्या सर्व रक्तदात्यांचा तसेच वेळोवेळी सहकार्य करणार्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा आहे, असे भावपूर्ण मनोगत राजू शेणई यांनी व्यक्त केले. आजगांव येथील हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी शिवप्रेमी बाळकृष्ण हळदणकर, प्रसाद मेस्त्री, अनंत पांढरे, प्रतीक भगत, रामा रेवाडकर, प्रमोद पांढरे, गुरु गवंडे, सुभाष पांढरे, जे. के. पांढरे आदिंनी मेहनत घेतली.
दरम्यान, याचवेळी मळेवाड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मळेवाडच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाडच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैष्णवी जोशी यांच्या हस्ते झाले, यावेळी व्यासपीठावर एसएसपीएम रक्तपेढीचे डाॅ. वानखेडे, लॅब टेक्निशियन मनिष यादव, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट, माजी जि. प. सदस्य बाळा शिरसाट, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मळेवाड सचिव श्रीकांत नाईक, ज्येष्ठ ग्रामस्थ गोपाळ रेडकर, रमाकांत नाईक, नंदू नाईक, राजन परब, तात्या परब, मंगेशदादा पाटील, अभिषेक रेगे, पत्रकार मदन मूरकर, परिचारिका जोत्स्ना नवार, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका सचिव श्री. बाबली गवंडे आदी उपस्थित होते.
हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी आत्माराम नाईक, मितेश नाईक, सुमित नाईक, सर्वेश नाईक, नामदेव नाईक, संजय शिरोडकर, स्वदेश नाईक, शेखर काळोजी तसेच शाळकरी विद्यार्थी आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू नाईक यांनी केले, तर आभार सचिव श्रीकांत नाईक यांनी मानले.
Sindhudurg