आंजर्लेतील समुद्राकडे कासवांची 81 पिल्ले झेपावली

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : कासवांची 81 पिल्ले आंजर्ले समुद्रात झेपावली. कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावतानाचे हे नयनरम्यदृष्य पाहण्यासाठी स्थानिक तर उपस्थितीत होतेच शिवाय आंजर्ले येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनाही या नयनरम्य सोहळयाचा सकाळी सकाळीच अगदी मनमुराद आनंद घेता आला. त्यामुळे आंजर्लेत पर्यटनासाठी आल्याचा पर्यटकांचा उद्देश चांगलाच सफल झाला.कडयावरच्या गणपतीचे सुप्रसिध्द ठिकाण असलेल्या दापोली तालूक्यातील आंजर्ले गावाला निसर्गतःच निसर्ग साधन संपत्तीच्या संपन्नतेचे वरदान लाभले आहे. अशा या आंजर्लेच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिना-यावर थंडीच्या शेवटी अन् उन्हाळयात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवांची वीण होते. मात्र आजही दुर्देवाने या कासवांची आणि त्यांच्या अंडयांची हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केली जाते. त्यामुळे कासवांचे आणि कासवांनी घातलेल्या अंडयांचे संरक्षण होण्यासाठी वन विभागाच्या सहाय्याने स्थानिक कासव मित्रांच्या सहकार्याने आंजर्ले समुद्र किना-यावर तब्बल 3168 अंडयांचे 27 घरटयांमध्ये संवर्धन करण्यात आले आहे.

संवर्धन केलेल्या घरटयांधून आज सकाळीच 81 कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली हे नयनरम्य दृष्य स्थानिकांनी तर अनुभवलेच शिवाय येथे आलेल्या पर्यटकांनाही अनपेक्षितपणे कासवांच्या जन्म सोहळयाचा आॅखो देखा हाल प्रत्यक्ष अनुभवता आला. त्यामुळे पर्यटक चांगलेच सुखावले. आंजर्लेत पर्यटनासाठी आल्याने निसर्गाची त्यांना विविधताही न्याहाळता आली. हा अपूर्व योग योगा योगाने त्यांना शनिवारी सकाळी अनुभवता आला.आंजर्लेत कासवांची अंडी संरक्षित करण्याचे काम दापोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दापोली तालूका वन अधिकारी साताप्पा सावंत, कोंगळेच्या वन रक्षक शुभांगी गुरव आदी अधिका-यांच्या सहकार्याने तृशांत भाटकर, अभिनय केळसकर, संदेश देवकर, सुयोग मयेकर आणि प्रथमेश केळसकर या कासवमित्रांनी यशस्वी केले आहे.

समुद्रि कासवांचे संवर्धन व संरक्षण करणे ही आंम्हाला निसर्गाने दिलेली एक संधी आहे. त्यामुळे कासव संवर्धन आणि संरक्षणाचे हे ईश्वरी कार्य आहे असे समजून आंम्ही ते काम ईमानाने करत आहोत. निसर्गाचा समतोल राखून सर्वांनी जीवन जगावे हाच यातून सर्वांना संदेश देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. – तृशांत सुरेश भाटकर, कासव मित्र