जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते वितरण
सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोलगाव विकास संस्थेमार्फत कोलगाव गावात बुधवारी शासनाच्या ‘आनंदाचा शिधा ‘ वाटप कार्यक्रम करण्यात आला. भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते अंत्योदय व केशरी शिधा पत्रिका धारकांना हे किट वितरीत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर गोरगरीब जनतेला दीपावलीनिमित्त अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पूर्ण राज्यभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोलगाव गावामध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महेश सारंग यांच्यासह सोसायटी चेअरमन वीरेंद्र धुरी, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी चेअरमन चंदन धुरी, प्रभाकर राऊळ, बलवंत कुडतरकर, बाबुराव चव्हाण, राजा चव्हाण, जयानंद म्हापसेकर, रवींद्र राऊळ, पुंडलिक राऊळ, संदीप हळदणकर, सुरेश दळवी, लक्ष्मण राऊळ, सलमा बेगम यांच्यासह शेकडो लाभार्थी उपस्थित होते. आनंदाचा शिधा वितरण कार्यक्रमाचा कोलगाव गावातील एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
Sindhudurg