२०% वेतन अनुदान वितरणाचे निघाले आदेश

शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची मॅरेथॉन कामगिरी

माखजन |वार्ताहर : नव्याने २०% अनुदान घेणाऱ्या उच्च माध्यमिक शाळांना,व नव्याने वाढीव २०% अर्थात ४०% वेतन घेणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना ३१ मार्च पूर्वी वेतन अनुदान लाभार्थी शिक्षकांच्या खात्यात जमा करावेत असे शासनाचे आदेश होते.व संबंधित निधी जिल्ह्याला वर्ग ही करण्यात आला होता.अनुदान वितरणाचे आदेश देण्याचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाना देण्यात आले होते.नव्याने २०% घेणाऱ्या उच्च माध्यमिक शाळांना डी.डी.ओ कोड देणे,शिक्षकांना शालार्थ आयडी अदा करणे,तसेच नव्याने २०% घेणाऱ्या व वाढीव २०% घेणाऱ्या(४०%)शाळांच्या सन २०२२-२३ च्या आधार व्हॅलिड वर संच मान्यता करणे,पटपडताळणी करणे,तपासणी करणे असे मोठे आवाहन कमी कालावधीत पूर्ण करणे हे शिक्षण उपसंचालकांसमोर होते.कोल्हापूर उपसंचालक कार्यालया अंतर्गत कोल्हापूर,सांगली,सातारा, सिंधुदुर्ग,रत्नागिरी असे पाच जिल्हे येतात,या जिल्ह्यातील २०% साठी नव्याने पात्र झालेल्या व वाढीव २०% घेणाऱ्या शाळांचे शासन निर्णयाप्रमाणे तपासणी करून,काल कोल्हापूर उपसंचालक मा महेश चोथे यांनी संबंधित शाळांना २०% वेतन अदा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

गत १५ दिवस शिक्षण उपसंचालक महेश चोथे दिवस रात्र ,सुटीच्या दिवशी देखील सगळ्या स्टाफ सोबत मॅरेथॉन पद्धतीने काम करीत आहेत.इतक्या जलद पद्धतीने काम झाल्याने शिक्षक वर्गातून उपसंचालक महेश चोथे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.पूर्ण राज्यात कोल्हापूर उपसंचालकांचे काम आघाडीवर असल्याचे चित्र आहे. कालमर्यादित् असलेले काम,शासकीय स्तरावर सक्षम अधिकारी असेल तर पूर्ण होऊ शकते याचे उदाहरणं उपसंचालक महेश चोथे यांनी राज्यासमोर उभे केले आहे.अल्पावधीतच नव्याने ४०% घेणाऱ्या उच्च माध्यमिक शाळांना देखील आदेश निर्गमित केले जातील अशी माहिती शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिली.शालार्थ आयडी काढणे,नव्याने उच्च माध्यमिक शाळांना डी.डी.ओ.कोड देणे हे काम खर तर बरेच किचकट असते.पण सगळ्या कागदपत्रांची पूर्तता स्वतः महेश चोथे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत पूर्ण करून घेतल्याने शिक्षकांना हे आनंदाचे दिवस दिसत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षण उपसंचालक व कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष महेश चोथे,सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले,हणमंत बिराजदार,महेश सावंत,लक्ष्मण पोवार,पोपट मलगुंडे आदी अधिकाऱ्यानी महत्वाची भूमिका बजावली.या कामात संघटनेचे भारत शिरगांवकर,विकास कुरणे व अन्य शिक्षकांनी अहोरात्र मदत केली.शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक महेश् चोथे यांचे आभार मानले आहेत.