पाटपन्हाळे | वार्ताहर : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या उपस्थित शहीद दिन संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रमोद देसाई यांच्या हस्ते शहीद भगत सिंह, डॉ. कृष्णाजी शिंघे यांच्या हस्ते शहिद राजगुरु व सौ. स्नेहल संसारे यांच्या हस्ते शहिद सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.यावेळी प्राचार्य प्रमोद देसाई यांनी शहीद भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या क्रांतीकारी चळवळ व विचारांचा संक्षेपात आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान याविषयीची भूमिका स्पष्ट करुन उपस्थित मान्यवर, प्राध्यापकवृंद व विद्याथ्यांनी आजच्या आपल्या देशातील परिस्थिती वेगळी आहे याची सर्वांनी दखल घेतली पाहिजेत. देशातील लोकशाहि कशी टिकून राहील याविषयी सातत्याने संविधानिक व अहिंसेच्या मार्गाने प्रयत्न करीत राहिले पाहिजेत असे सांगितले.या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, डॉ. सुभाष खोत, वरीष्ठ लिपिक श्री. सुधीर टानकर, डॉ. कृष्णाजी शिंधे, सौ. स्नेहल संसारे, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर श्री पर्शुराम चव्हाण, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. संदिप चव्हाण, व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले.