रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे गावची ८ वर्षीय समायरा रुमान पारेख या मुलीच्या विडीयोची खूद्द महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौघुले यानी दखल घेतली. त्याचे झाले असे की सैतवडे गावची ८ वर्षीय समायरा पारेख ही महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौघुले यांची खूप मोठी चाहती आहे. ती समीर चौघुले यांच्या अनेक हास्य विनोदी विडीयोज वर रील्स बनवून इंस्टाग्राम वर पोस्ट करत असते. असाच एक समीर चौघुले यांचा प्रसिध्द लोचन मजनू उंदीर मांजर पकडींगो या वर तिने रील्स बनवून इंस्टाग्राम वर पोस्ट केला. आणि तो विडीयो खूद्द समीर चौघुले यांच्या बघण्यात आला. तो विडीयो बघितल्यावर समीर चौघुले यानी खूद्द त्याची दखल घेत समायरा ला मेसेज करून तिच्या या विडीयो साठी प्रेम आणि धन्यवाद दिले. एवढी लहान मुलगी सुद्धा त्यांच्या विनोदाची आणि कामाची चाहती असू शकते यांचा त्याना विश्वास बसत नव्ह्ता आणि तिला मेसेज न करता त्याना राहावलेच नाही. खुद्द एवढा मोठा सेलेब्रिटी चा मेसेज बघुन समायराचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि आपण अजून चांगले काम करू असे आश्वासन ही तीने समीर चौघुले सराना दिले. ते आता तिच्याशी नेहमीच मेसेज वर बोलत असतात आणि सैतवडे सारख्या लहान गावातील एका लहान मुलीची समीर चौघुले सारख्या कलाकराने प्रशंसा करणे ही खरच अभिमानची गोष्ट आहे.