महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणेंच्या विजयासाठी चिपळूणमध्ये महायुतीचे नेते- पदाधिकारी एकवटले

रविवार दि. २१ एप्रिल रोजी चिपळूण शहरातील प्रचार फेरीचा होणार शुभारंभ

चिपळूण (संतोष सावर्डेकर):– रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या चिपळूण शहरातील प्रचार फेरीचा शुभारंभ रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिर देवस्थान येथे होणार आहे. तत्पूर्वी चिपळूणमधील पुष्कर सभागृहात झालेल्या बैठकीत महायुती एकवटल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

 

 

 

 

दोनच दिवसांपूर्वी महायुतीतर्फे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीयमंत्री ना. नारायणराव राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर शुक्रवारी ना. राणे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदारांची विराट गर्दी पाहिली.

 

 

 

 

यानंतर महायुतीचे नेते ना नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. या अनुषंगाने शनिवारी चिपळूणमधील पुष्कर येथील सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत ना. नारायणराव राणे यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची दिनांक २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत सभा होत असून या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

 

 

 

 

तर महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांच्या चिपळूण शहरातील प्रचार फेरीचा रविवार दिनांक २१ रोजी सकाळी ९ वाजता चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिर देवस्थान येथे शुभारंभ होणार आहे. यानंतर चिपळूणशहरात महायुतीमय वातावरण करण्याचा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार आहे, तरी यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.