दिव्यांग व्यक्ती मध्ये आम्ही देव पाहतो- विनायक खटावकर

Google search engine
Google search engine

दिव्यांगाना कुबड्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प

एस्काँनतर्फे 76 दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप

संतोष कुळे | चिपळूण : समामजातील दिव्यांग घटकाला मदतीचा हात देण्यासाठी आम्ही दिव्यांग सेवेचे व्रत हाती घेतले आहे . दिव्यांग मध्ये आम्ही देव पाहतो. खर तर त्यांची सेवा करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे. आम्ही त्यांच्यावर उपकार करत नसून त्यांचेच उपकार आमच्यावरती आहेत. नर नारायण जसा आम्ही पुजतो. असाच दिव्यांगांमध्येही आम्हाला नर नारायण दिसतो. दिवांग्यांना कुबड्यांपासून मुक्त करणे हा आमचा संकल्प असून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करताना खऱ्या अर्थाने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे मत भारत विकास परिषद पुणे कार्याध्यक्ष विनायक खटावकर यांनी बोलताना व्यक्त केले.
एस्काँन प्रो. फाऊंडेशन पुणे व रोटरी क्लब आँफ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्यामार्फत मोफत दिव्यांग शिबीर चिपळूण मार्कंडी, पवन तलाव जवळ श्री पद्मावती संकुलात उद्या रविवारी घेण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना श्री खटावकर म्हणाले की, कोकणातील माणूस स्वभावाने गोड आहे. तो सहजासहजी कोणाची मदत घेत नाही. मात्र, या भुमिशी माझे वेगळे नाते असल्याने सेवेचा भाव मनात ठेवत येथील दीव्यांग यांना मदतीचा हात देत आहोत. निलेश चव्हाण यांच्या सारखे समाजाचे दायित्व निभावणारे उद्योजक आणि त्यांची सेवेचे भावना यामुळेच दिव्यांगांना कृत्रिम पाय व हात देण्याचा हा उपक्रम आहे. त्यामुळे मोफत दिव्यांगाना साहित्य देत आहोत याची माहिती सर्वांना समजणे गरजेची आहे. पुणे येथे कधीही यावे दिव्यांग व्यक्तींना सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात उपस्थित दिव्यांगाना मोफत अत्याधुनिक मोड्यूलर कृत्रिम पाय ४५, हात ०५ व कँलिपर २६ असे एकूण ७६ कृत्रिम अवयव देण्यात येणार आहेत. श्रीमती शेवंती शंकर चव्हाण यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृत्रिम अवयवांचे पूजन करून दिव्यांगाना त्यांचे वाटप करण्यात आले.

या शिबिराला पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, गुहागर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड, भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणेचे विनय खटावकर, रोटरी क्लब चिंचवडचे अध्यक्ष महावीर सत्याअण्णा, रोटरी क्लब स्काँन प्रो. लि. पुणेचे अध्यक्ष महेश मायदेव, स्काँन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक निलेशभाई चव्हाण, स्काँन संचालक नंदिनी चव्हाण, सर्व दिव्यांग बांधव, स्काँन प्रोजेक्टचे सर्व सहकारी उपस्थित होते. दिव्यांगाना मोफत अत्याधुनिक मोड्यूलर कृत्रिम अवयव वाटप करणारे भारत विकास परिषद व त्यांना सहकार्य करणारे स्काँन प्रोजेक्टचे संस्थापक अध्यक्ष निलेश चव्हाण यांचे मान्यवरांसह दिव्यांगानी शब्दसुमनानी कौतुक करत आभार मानले.

एस्काँन प्रोजेक्ट नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आले आहे. कोरोना आपत्तीत गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप, चिपळूण महापुरातील पूरग्रस्तांना संसारउपयोगी वस्तूंचे व औषधांचे वाटप केले आहे. पूरग्रस्तांना सर्वाधिक मदत स्काँन प्रोजेक्टने पाठविली होती. शाळांमधील गरीब, गरजू विद्यार्थांना शैक्षणिक मदत केली आहे. आता चिपळूणात दिव्यांगासाठी मोफत शिबीर भरवून त्यांना मदतीचा हात दिला आहे. भविष्यात असे समाजाभिमुख उपक्रम भव्य प्रमाणात राबविण्याचा मानस स्काँन प्रोजेक्टचे सर्वेसर्वा उद्योजक निलेश चव्हाण यांनी बोलून दाखविला आहे. स्काँनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सूत्रसंचालन राहुल पूरकर यांनी केले. आभार प्रशांत सुरडीकर यांनी मानले.