पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पाहण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांची मालवण भाजप कार्यालयात उपस्थिती

Google search engine
Google search engine

 

मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून गेली काही वर्षे मन की बात हा कार्यक्रम सातत्याने करत आहेत. जनतेचा प्रतिसाद नेहमीच या कार्यक्रमाला मिळतो. रविवारी मन की बात हा कार्यक्रम होता. याच वेळी मालवण दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण भाजप कार्यालयात उपस्थित राहत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबत मन की बात कार्यक्रम पहिला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, आबा हडकर, महेश सारंग, बबलू राऊत, ललित चव्हाण, राजू बिडये, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.