परबवाडा येथील “काजु लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण” कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद..

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले | प्रतिनिधी : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला व परबवाडा ग्रामपंचायत व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने परबवाडा येथे “काजु लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण” संपन्न झाले. यावेळी परबवाडा सरपंच सौ. शमिका बांदेकर, डॉ. संजयजी भावे संशोधन संचालक, डॉ. राजन खांडेकर सहयोगी संशोधन संचालक, डॉ. राजेंद्र भिंगार्डे उद्यानविद्यावेत्ता, डॉ विजय देसाई किटकशात्रज्ञ, श्री ललीत खापरे काजू शात्रज्ञ, डॉ. सौ स्मिता देशमुख मृदा शास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक जीवन परब या सर्वांनी काजू लागवड कशी करावी, कोणती खते व कीटकनाशके वापरावी, मृदा परीक्षण का करावे, काजू उत्पादनातून आर्थिक सुलभता कशी मिळेल, वेंगुर्ला काजू मधील कोणत्या जातीच्या काजूची लागवड करावी. याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी परबवाडा गावातील 57 ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उपसरपंच पपू परब, ग्राम सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अरुणा गवंडे व सूहिता हळदणकर, मनवेल फर्नाडीस, गजानन परब, नरेंद्र नाईक हरिश्चंद्र मांजरेकर आदी व ग्रामस्थ उपस्थित होते