रत्नागिरी : कटक (ओडिशा) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी करून सुरभीने कांस्यपदके जिंकले.तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.सर्व खेळाडूंना संघ व्यावस्थापक अजित घारगे,संघ प्रशिक्षक प्रशांत टी. कांबळे, व दिनेशसिंग राजपूत. पुमसे प्रशिक्षक रॉबिन वॉल्टर मेनेझेस. यांचे मार्गदर्शन लाभले.सुरभीला संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे.
रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री उदय सांमत, उद्योजक किरण सांमत, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम व प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार वेंकटेश कररा, नीरज बोरसे, सतीश खेमसकर बालाजी पाटील जोगदंड, रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन उपाध्यक्ष विश्र्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, मयूर खेतले, संजय सुर्वे, सचिव लक्ष्मण कररा,गणराज तायक्वॉडो क्लब चे अध्यक्ष श्री प्रशांत मनोज मकवाना, उपाध्यक्ष श्री अभिजित विलणकर, सचिव सौ.रंजना मोडूळा, खजिनदार सौ.नेहा किर, सौ. साक्षी मयेकर, सौ.पुजा कवितके, सौ कनिष्का शेरे, श्री.भगवान गुरव यांनी एस.आर.के क्लबचे अध्यक्ष. श्री.शाहरुख शेख, श्री.मिलिंद भागवत क्रिडा शिक्षक अनिकेत पवार आदींनी पदक विजेती सुरभी चे प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना यांचे अभिनंदन केले आहे व उर्वरित खेळाडूंसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.