गवाणे येथील कंस, बलराम कृष्ण युद्ध स्पर्धेत श्री नवलादेवी नमन मंडळ हरमलेवाडी देवधे प्रथम

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील गवाणे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय भव्य दिव्य कंस, बलराम आणि कृष्ण युद्ध स्पर्धेत देवधे येथील श्री नवलादेवी नमन मंडळ हरमलेवाडी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा आणि शिवसेना उद्धव ठाकरे शाखा गवाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.गवाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण बारा स्पर्धक संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत श्री नवलादेवी नमन मंडळ हरमलेवाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक बनदेवी नमन मंडळ रामाणेवाडी गवाणे तर तृतीय क्रमांक नवलादेवी नमन वनगुळे व जय भराडी नमन मंडळ खानवली चिंचवाडी या दोन संघांना विभागून देण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट बलराम भूमिकेसाठी नवलादेवी नमन मंडळाच्या विजय सोमा हरमले यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळाला रोख रुपये ५५५५ व चषक, द्वितीय विजेत्यांना ३३३३ व चषक आणि तृतीय विजेतांना २२२२ व चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले .या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.