केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली महायुतीच्या प्रचार कार्यालयाला सदिच्छा भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली महायुतीच्या प्रचार कार्यालयाला सदिच्छा भेट

लांजा (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी आज रविवारी सायंकाळी लांजा येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयास सदिच्छा भेट दिली आणि उपस्थित भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचला असून आज सायंकाळी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज सायंकाळी लांजा येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाला सदिच्छा भेट दिली .यावेळी त्यांचे लांजा तालुका भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्व भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तालुक्यात जोमाने कामाला लागा असे आवाहन केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांच्यासह मुंबईतील झायेद खान, लांजा तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष प्रसन्न शेट्ये तसेच भाजपाचे शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, भाजपा युवा मोर्चा लोकसभा संयोजक आणि नगरसेवक संजय यादव तसेच जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर ,तालुका सरचिटणीस शैलेश खामकर, जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये ,बाबा लांजेकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.