गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वर्धापन दिनी दिव्यांगांना साहित्य वाटप

Distribution of materials to the differently abled on the anniversary of Guhagar Taluka Apang Rehabiliation Sansthan

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २१ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यावसायिक दिव्यांगाना शितपेटीचे वाटप करण्यात आले तर गरजू दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यावसाय करण्यासाठी रवींद्र जांभारकर (नवानगर), सिद्धेश भोसले (आरेगाव), सुहानी आंबेरकर (बुधल), गंगाजी भोसले (नवानगर) या दिव्यांगाना शितपेटीचे वाटप करण्यात आले. तसेच अनिल कुंभार (जामसुत), प्रकाश कांबळे (दोडवली), सखाराम घाडे (वेळंब) यांना कुबड्या तर संजय मिसाळ (आंजर्ले ता. दापोली) यांना व्हीलचेअर असे कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. दिव्यांग संस्थेला व दिव्यांगाना वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दात्यांचा दिव्यांग संस्थेमार्फत मानाचा असा दिव्यांग मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्धापन दिनानिमित्त श्रीसत्यनारायणाची महापूजा, सत्कार समारंभ, साहित्य वाटप, हळदी कुंकू, विविध गुणदर्शन कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक कनगुटकर शिवसेना तालुका प्रमुख गुहागर, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, संस्थेचे जेष्ठ सल्लागार विनायक ओक. डॉ. अनिल जोशी, प्रकाश बापट, केंद्र प्रमुख श्रीकांत वेल्हाळ, सर्पमित्र प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, पालशेत हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, संस्थेचे सल्लागार रवींद्र कुळ्ये, किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुट, बाबासाहेब राशिनकर, अरुण भुवड, वरवेली गावचे ग्रामसेवक महेद्र भुवड, वरवेलीचे पोस्टमास्टर आशिष सोलकर, गुहागर हायस्कूलचे विलास कोरके, दिलीप मोहिते सर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अड. सुशील अवेरे, रत्नाकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, सरचिटणीस सुनील रांजाणे, खनिजदार सुनिल मुकनाक, संचालक अनिल जोशी आदी मान्यवर व मोठ्या संख्येने दिव्यांग सभासद उपस्थित होते.