राम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात येणार भव्य रथयात्रा मिरवणूक

Google search engine
Google search engine

बजरंग दल लांजा च्या वतीने आयोजन

लांजा| प्रतिनिधी : श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून बजरंग दल लांजाच्या वतीने गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी लांजा शहरातून श्री प्रभू रामचंद्रांची भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी असलेल्या रामनवमीचे औचित्य साधून ही भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवार सायंकाळी ५.३० वाजता शहरातील साटवली रोड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या रथयात्रेला सुरुवात होणार असून ही यात्रा मिरवणूक लांजा शहरातील श्री राम मंदिर इथपर्यंत काढण्यात येणार आहे .तरी शहर परिसरातील सर्व भक्तांनी या रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन बजरंग दल लांजाच्या वतीने करण्यात आले आहे.