अपघातात बांदा पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांच्यासह अन्य जखमी
झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे अपघात
सावंतवाडी । प्रतिनिधी :
बांदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के हे आपल्या ताब्यातील कारने कुडाळच्या दिशेने जात असताना कुडाळ वरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाच्या पलीकडे येऊन त्यांच्या कारवर धडकल्याने झालेल्या अपघातात सोनटक्के यांच्यासह समोरील गाडीतील प्रवासीही जखमी झाले. कोल्हापूर येथील कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडीलगत बादेकर यांच्या घराण्याची अपघात घडला. या अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यावेळी सावंतवाडी चे माजी सभापती राजू परब मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी संजय जोशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते
sindhudurg.













