वडाचापाट येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!

मसुरे | झुंजार पेडणेकर : नवतरुण मित्रमंडळ वडाचापाट यांच्या वतिने १ व २ एप्रिल २०२३ रोजी रिलायन्स टॉवर मैदान वडाचापाट येथे सरपंच / उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम पारितोषिक माजी सभापती श्री राजेंद्र प्रभुदेसाई यांस कडून :- ८५५५ /- (व आकर्षक चषक ) , द्वितिय पारितोषिक माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर व सेवानिवृत्त ग्रामसेवक अंकुश मुणगेकर यांसकडुन ५५५५ रुपये व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक:२२२२/व आकर्षक चषक मा.श्री.विजय जोशी व मा.श्री.प्रणित बिलये. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व सामनावीर यासाठी अविनाश कासले यांजकडून आकर्षक चषक. विशेष सहाय्य दया देसाई मित्रमंडळ वडाचापाट यांचे लाभणार आहे.अधिक महिती साठी सचिन पाताडे (9405497536), समीर मुंबरकर (9404344373) येथे संपर्क साधावा.