“Vasant Smriti…” will be staged in Sawantwadi on April 2.
मोती तलावातील केशवसुत कट्टा येथे मैफिलीचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : कै.गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी यांच्या तर्फे “वसंतस्मृती” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. वसंत कानेटकर, पं. वसंतराव देशपांडे, संगीतकार वसंत प्रभू, श्री वसंत पवार, संगीतकार वसंत देसाई, गीतकार वसंत निनावे, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या प्रतिभेतून साकार झालेल्या गीतांचा सदाबहार नजराणा या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित ही मैफिल रविवार दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ६ वा. “केशवसुत कट्टा, मोती तलाव सावंतवाडी” येथे सादर करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाचे विद्यार्थी सादर करणार आहेत तरी, या कार्यक्रमास सर्व रसिकांनी व संगीतप्रेमींनी उपस्थीत राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक श्री निलेश मेस्त्री आणि पालकवर्गाकडून करण्यात आले आहे.
Sindhudurg