भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न

KSPG campus interview conducted in Bhosle Polytechnic

पुणे येथील प्रकल्पासाठी ५२ विद्यार्थ्यांची निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी :यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजी या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले.कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये भोसले पॉलिटेक्निक बरोबरच शासकीय तंत्रनिकेतन, मालवण व एमआयटीएम,ओरोस येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते. जिल्ह्यातील एकूण ९१ विद्यार्थ्यांनी या इंटरव्ह्यू प्रक्रियेत भाग घेतला. ऑनलाइन टेस्ट व मुलाखतीनंतर ५२ विद्यार्थ्यांची पुणे येथील प्रकल्पासाठी निवड करण्यात आली.इंटरव्ह्यू घेण्यासाठी कंपनीचे एचआर मॅनेजर श्रीकांत बोंगाळे, प्रॉडक्शन मॅनेजर आनंद मिश्रा, फॅक्टरी मॅनेजर पी.व्ही.संतोष, असिस्टंट मॅनेजर चेतन नाईक-निंबाळकर उपस्थित होते.सर्व अधिकाऱ्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांच्या टॅलेंटचे विशेष कौतुक केले व असे इंटरव्ह्यू आयोजित करण्यासाठी भोसले पॉलिटेक्निक घेत असलेल्या पुढाकाराबद्दल संस्थेची प्रशंसा केली.ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी कॉलेजचे टीपीओ विभाग प्रमुख मिलिंद देसाई, महेश पाटील, राहुल गिर्याळकर, हवाबी शेख, सचिन लांजेकर व श्रुती हेवाळेकर यांनी मेहनत घेतली