शृंगारतळी बाजारपेठेत गटारावरील पडलेले भगदाड अर्धवट स्थितीत

Google search engine
Google search engine

Shringaratali market place is in partial condition

प्रहारच्या वृत्तानंतर ठेकेदाराने केली कामाला सुरुवात मात्र अडथळ्यामुळे काम पुन्हा बंद

गटारात सोडले जातेय घाणीचे पाणी; परिसरात दुर्गंधी

पाटपन्हाळे | वार्ताहर : अखेर गेल्या दोन महिन्यानंतर शृंगारतळी बाजारपेठेत गटाराला पडलेल्या भगदाडाच्या कामाला सुरूवात केली होती मात्र गटारात अनेकांनी सोडलेल्या घाणीच्या पाण्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.
दोन महिन्यापुर्वी शृंगारतळीत बाजारपेठेत रेती घेऊन आलेल्या डंपरने गटाराला भगदाड पडले होते याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र दै. प्रहारने या विषयाची बातमी लावल्यानंतर या गटाराच्या कामाला सुरूवात केली. मात्र या गटारात घाणीचे पाणी असल्याने आणि पुढे गटार अर्धवट असल्याने पाणी साचलं आहे. याठिकाणी गटारात बिल्डींगच्या तसेच दुकानदारांचे अस्वच्छ पाणी या गटारात सोडल्याने हे गटार तुटुंब भरले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेकेदाराला काम करण्यास अडचण निर्माण झाली आहे. हे गटार पावसाच्या पाणी वाहून जाण्यासाठी असून या ठिकाणी सर्वच जण आपआपले पाईप सोडत असल्याने यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची संख्या वाढली आहे. यामुळे आरोग्यचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पाहणी करावी, अशी मागणी केली जात आहे.