रामनवमीचे औचित्य मनसेचा आदर्शवत उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रामनवमीचे औचित्य साधत फुकेरी येथील हनुमंत गडावर छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर सोलार फ्लड लाईट तसेच सोलार मशाल लाईट यांचे लोकार्पण मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मागणीनुसार मनसेचे माजी तालुका सचिव आबा चिपकार यांनी यासाठी पुढाकार घेतला व महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेनाचे अध्यक्ष श्री गणेश कदम तसेच सह संपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांचे लक्ष वेधून सदर सोलर लाइट्स साठी पाठपुरावा केला.
उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे गणेश कदम यांचे सोलर लाइट्स तसेच मशाल लाईट्स ची मागणी पूर्ण केल्याने आभार मानले.यावेळी मा शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव आबा चिपकर, शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, म.न.वि.से तालुकाध्यक्ष स्वप्निल कोठावळे, तालुका उपाध्यक्ष दर्शन सावंत, प्रशांत तळकर, मयूर सावंत आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ, दुर्ग सेवक दिनेश सावंत, शुभम नाईक, एकनाथ गुरव, सिद्धेश धुरी आदी सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.