Shri Ram birth festival in Fondaghat! Anand Solah was concluded with various activities
श्री पाचोबा देवस्थान आणि श्री साई मंदिरात, राम भक्तांची अलोट मांदियाळी !
फोंडाघाट |कुमार नाडकर्णी : विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक घराघरात मर्यादा पुरुषोत्तम श्री राम- हनुमंताची आराधना नित्य नेमाने होत असते. त्याचाच अत्युच्च कळस, म्हणजे रामनवमी, निमित्ताने अनुभवास मिळतो. फोंडाघाट पंचक्रोशीतील भाविकांचे आराध्य किंबहुना गावातून जाता- येता ज्यांच्या कृपाछत्राने काम सिद्धीस जाते, अशी श्रद्धा असलेने, वाहन चालक, वाटसरू, महिला भगिनी, ग्रामस्थ आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव पाचोबा परिसरात आणि हवेलीनगर मधील मध्यवर्ती श्री साई मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला.
पाचोबा देवस्थान आकर्षक फुलांच्या सजावटीने सुगंधी झाला होता.सकाळी अभिषेक-पूजाअर्चा झाल्यावर श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाला एकच गर्दी झाली. संध्याकाळी सर्वांचा आवडता होम मिनिस्टर स्पर्धा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. त्यानंतर सर्वांसाठी विविध फनिगेम्स आयोजन करण्यात आले होते. स्थानिक भजनांसह, स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ- तांबोळी सा.वाडी यांचे भजनाला सर्वांनी दाद मिळवुन दिली.दुपारी ठीक बारा वाजता रामनामाच्या जयघोशात राम जन्म संपन्न झाला. श्री देव पाचोबा मित्र मंडळ- डांबरे,फोंडाघाट चे अबालवृद्ध,युवा युवातींनी सोहळ्याचे बहारदार नियोजन केले होते. जिल्हाध्यक्ष संजय आग्रे उभयतांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी या उत्सव सोहळ्यात उपस्थिती दर्शविली.
हवेली नगर मधील श्री साई मंदिर येथेही उदंड उत्साहात रामजन्म व त्यानिमित्ताने अनेकविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री साई शैक्षणिक व सामाजिक सेवा मंडळ यांनी उत्कृष्ट रीतीने नियोजनबद्ध केले. काकड आरतीने- महाभिषेकाने आणि महाआरतीने सकाळचे वातावरण प्रसन्न केले.जीवन विद्या मिशन फोंडाघाट कडून उपासना यज्ञ संपन्न झाला. दुपारी राम जन्मोत्सव रामनामाच्या जयजयकारात आणि ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला. महिलांनी पाळणा म्हटला. दुपारी श्री साई सतचरित्राचे पारायण झाले. संध्याकाळी मंदिर ते राधाकृष्ण मंदिर इथपर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री रामेश्वर ढोल पथक- करूळ यांचे ढोल वादन लक्षवेधी ठरले. मंदिर प्रांगणात रंगदेवता प्रासादिक दिंडी भजन मंडळ -असरुंडी यांचे वारकरी भजन व स्थानिकांसाठी रात्री उशिरापर्यंत बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दुपारी महाप्रसादाला अबाल वृद्ध महिला पुरुषांनी उदंड गर्दी केली होती. परंतु सेवा मंडळाच्या युवा -युवतीने आणि स्थानिक महिलांनी उत्कृष्ट नियोजन केले….