जि.प.चे मुख्याधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सन्मानपत्र
कुडाळ । प्रतिनिधी : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कुडाळचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी लक्ष्मीकांत उर्फ संजय मधुसूदन डुबळे हे आपल्या नियत कालमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्ती प्रित्यर्थ जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते त्यांना सेवा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निरंतर व प्रामाणिकपणे सेवा केलीत. आपल्या सेवा कालावधीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आपले बहुमूल्य योगदान लाभले असून ते कायम स्मरणात राहील. त्यामुळे आपल्या सेवानिवृत्ती बाबत सेवा सन्मान पत्र प्रदान करताना समाधान वाटत आहे. जलसंधारण अधिकारी पदावरून आपण सेवानिवृत्त होत आहात यावेळी तोच उत्साह व तेच चैतन्य आपल्या ठायी कायम आहे. तेच आयुष्यभर टिकू अशा शब्दात त्यांच्या प्रती सद्भावना व सदिच्छा या सन्मानपत्रात व्यक्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जलसंधारण अधिकारी लक्ष्मीकांत डुबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रत्यक्ष सोमवार ३ एप्रिल रोजी त्यांच्या कार्यालयातर्फे निरोप समारंभ ठेवण्यात आला असून त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.