कोरगावकर भावंडांची मालवण दांडी शाळेला एक लाखाची शैक्षणिक मदत!

Educational assistance of one lakh to Malvan Dandi school of Korgaonkar siblings!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण – दांडी शाळेला कोरगावकर कुटुंबीयांनी एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत सुपूर्द केली. कै.सदाशिव नारायण कोरगांवकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या कन्या सौ.वर्षा संतोष रेवडेकर-कोरगांवकर, सौ वृंदा उमेश शिरसाट- कोरगांवकर आणि पुत्र श्री.सागर सदाशिव कोरगावकर यांनी दांडी शाळेला सदर शैक्षणिक मदत दिली. कामानिमित्त मुंबई,पुणे येथे स्थायिक झालेली ही भावंडे दांडी शाळेची माजी विद्यार्थी मालवण मध्ये आली असता त्यांनी दांडी शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून दांडी शाळेच्या गरजा विचारून दांडी शाळेला आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त कायमस्वरूपी पन्नास हजार रुपयाची ठेव रक्कम तसेच दांडी शाळेच्या वाचनालय व विज्ञान प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली दोन मोठी कपाटे भेट दिली तसेच वाचनालयासाठी सुमारे पाच हजाराची पुस्तके अशी सुमारे एक लाखाची भेट दिली.तसेच दांडी शाळेची शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनी कु.विधिशा कुबल हीस दोन हजार रु.बक्षिस दिले.

दांडी शाळेमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम,शिक्षकांची मेहनत व योगदान याबद्दलची माहिती सौ.वर्षा रेवडेकर-कोरगांवकर यांना त्यांच्या बालमैत्रिण सौ.स्मृती महेश कांदळगावकर यांनी वेळोवेळी दिली त्यामुळे आपल्या बालपणीच्या शाळेला मदत द्यायची असे कोरगांवकर भावंडांनी ठरवले.आपल्या मूळ गावापासून मुंबई पुणे येथे बऱ्याच अंतरावर नोकरी करत असतेवेळी आपल्या बालपणीच्या शाळेविषयी जन्मदात्या वडिलांविषयी जे प्रेम, जिव्हाळा,आपुलकी या भावंडांच्या मनात आहे ती खरेच कौतुकास्पद आहे,सामाजिक बांधिलकी जपणारी ही दानशूर भावंडे आमच्या दांडी शाळेशी पुन्हा जोडली गेली याबद्दल सार्थ अभिमान वाटतोअसे गौरवोद्गार सौ.वर्षा कोरगावकर यांच्या स्नेही तथा शालेय पोषण आहार जिल्हा लेखाधिकारी श्रीम. सुषमा खराडे मँडम यांनी सदर सोहळ्यात व्यक्त केली.सदर कार्यक्रमास सौ.वर्षा रेवडेकर/कोरगांवकर,सौ.वृंदा शिरसाट/कोरगावकर,लेखाधिकारी श्रीम. सुषमा खराडे मॅडम, मुख्या.सौ. विशाखा चव्हाण मॅडम,राज्य पुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत सर,सौ.मनीषा ठाकूर मॅडम,श्री. रामदास तांबे सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
दांडी शाळेला दिल्या गेलेले या शैक्षणिक मदतीसाठी दांडी शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ,111 गौरव समिती व समस्त दांडी ग्रामस्थ यांजकडुन कोरगांवकर भावडांचे विशेष कौतुक होत आहे.