वनगुळे ब्राह्मणवाडी येथे दिनांक ५ ते ७ एप्रिल या कालावधीत हनुमान जयंती उत्सव

Hanuman Jayanti festival from 5th to 7th April at Vangule Brahmanwadi

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील वनगुळे येथील श्री हनुमान नाट्य मंडळ ब्राह्मणवाडीच्या वतीने दिनांक ५ ते ७ एप्रिल या कालावधीत श्री हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री हनुमान नाट्य मंडळ वनगुळेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या हनुमान जयंती उत्सवानिमित्त बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हरिपाठ ,त्यानंतर ह. भ. प. प्रशांत बुवा महाराज यांचे कीर्तन आणि रात्री ८ वाजता आरती मंत्र पुष्प. दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्री मारुती जन्मोत्सव व ह. भ. प. प्रसाद पराडकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर तीर्थप्रसाद आणि रात्री १०.३० वाजता नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे .दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता आरती आणि त्यानंतर ८.३० वाजता श्री हनुमान भजनी मंडळ ब्राह्मणवाडी वनगुळे यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.