सलोखा योजनेअंतर्गत कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हयात खेड मधील पहिले प्रकरण निर्णीत

Google search engine
Google search engine

Under the Salokha scheme, the first case decided in a village in Ratnagiri district in Konkan division

खेड | प्रतिनिधी :.मुख्य़मंत्री व .महसूल मंत्री यांचे संकल्प़नेतून “ सलोखा योजनेबाबत ” महाराष्ट़ शासन, महसूल व वनविभागाकडील शासन निर्णय क्रमांक.मुद्रांक-२०२२/प्र.क्र.९३/म.१ (धोरण), दिनांक ३ जानेवारी, २०२३ मधील तरतूदीनुसार खेड तालुक्यातील मौजे राजवेल येथील सलोखा योजनेअंतर्गत जिल्हयातील पहिले प्रकरण निर्णीत करुन शेतकऱ्याला जमिनीचा हक्क मिळवून दिलेला आहे.

शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा नांवावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क़ नाममात्र रु.१-हजार व नोंदणी फी नाममात्र रु.१ हजार आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. २२ व २३ फेब्रवारी २०२३ रोजी लोणी, जि.अहमदनगर येथे झालेल्या महसूल परिषदेनंतर .श्री.उदय सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांनी रत्नागिरी जिल्हयाची आढावा बैठक घेवून रत्नागिरी जिल्हयामध्ये “सलोखा योजना ” प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना संबोधित केले होते.

सदरचे योजनेअंतर्गत मौजे राजवेल, ता.खेड, जि.रत्नागिरी येथील गट नंबर ३६, क्षेत्र ०-१२-० हे.आर, आकार ०-०६ ही शेतजमीन श्री.अब्बास अ.रहिमान हमदुले, श्री.महमद हनिफ अ.रहिमान हमदुले व श्री.मुश्ताक अ.रहिमान हमदुले यांचे सामाईक नांवे दाखल असून, सदरची शेतजमीन श्री.महामुद म.हुसेन हमदुले हे गेली १७ वर्षे वहिवाट व कसत आहेत. तसेच सदरचे गांवामधील गट नंबर ७९, क्षेत्र ०-२४-० हे.आर, आकार ०-१३ ही शेतजमीन श्री.महामुद म.हुसेन हमदुले यांचे नांवे दाखल असून, सदरची शेतजमीन श्री.अब्बास अ.रहिमान हमदुले, श्री.महमद हनिफ अ.रहिमान हमदुले व श्री.मुश्ताक अ.रहिमान हमदुले हे गेली १७ वर्षे वहिवाट व कसत आहेत.
विभागीय आयुक्त, कोकण विभाग डॉ.महेंद्र कल्याणकर, आणि श्री.एम.देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात एक शिबीर घेण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच २१ प्रस्ताव सादर केले असून श्रीम.राजश्री मोरे, उपविभागीय अधिकारी, खेड व श्रीम.प्राजक्ता घोरपडे, तहसीलदार, खेड यांनी खेड तालुक्यात *“ सलोखा योजनेअंतर्गत जिल्हयातील पहिले प्रकरण निर्णीत करुन शेतकऱ्याला जमिनीचा हक्क मिळवून दिलेला आहे.
विभागीय आयुक्त, कोकण विभाग डॉ.महेंद्र कल्याणकर, यांनी या कामासाठी विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे कौतुक केले आहे.