Fondaghat Maha. The bank is known because of Ramdas Jadhav’s working style! – Branch Officer Ganesh Sivathare.
बँकेतील सकारात्मक वावर असल्याने जाधव यांची उणीव नक्की जाणवेल ! – व्यापारी संघ अध्यक्ष यशवंत मसुरकर.
महाबँक कर्मचारी रामदास जाधव यांचा सपत्नीक सत्कार सोहळा पार
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : आपल्या उपस्थितीने मी आजवर केलेल्या कामाची पोचपावती मिळाली, असे भावपूर्ण उद्गार सत्कारमूर्ती रामदास जाधव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. फोंडाघाट – बँक ऑफ महाराष्ट्र, व्यापारी संघ आणि ग्रामस्थांच्या वतीने,बँक कर्मचारी व ग्रामस्थ तसेच मानकरी रामदास जाधव यांचा सत्कार बँक अधिकारी व सहकारी वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना बँक शाखाधिकारी गणेश शिवथरे यांनी जाधव यांच्या ग्राहकांप्रती असलेला आपलेपणा, कार्य तत्परता आणि स्नेहभावाचे कौतुक करताना ,महा बँकेची ग्राहकांमधील ओळखीचे एक कारण म्हणजे रामदास जाधव ! त्यांचा सत्कार आमच्या हातून होत असल्याचा अभिमान वाटतो, असे सांगून निवृत्तीनंतरही गरजेप्रमाणे,त्यांचे बँकेला सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्यापारी संघाचे अध्यक्ष यशवंत मसुरकर, ज्येष्ठ व्यापारी बाळा डोरले, राजू पटेल,संतोष टक्के, श्रीकृष्ण नानचे, उदय माईणकर इ.नी जाधव यांच्या सेवा पद्धतीचे आणि सामाजिक भानाचे कौतुक करताना, येथील अधिकारी- कर्मचारी वर्गासाठी त्यांची वागणूक व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यामुळे त्यांच्या सुपुत्रास मिळालेली संधी वाया जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
याप्रसंगी फोंडाघाट कॉलेजचे दिलीप सावंत – सहकारी, संजय सावंत, शामराव सावंत ,अनिल बांदिवडेकर, डोरले, रामचंद्र सावंत, यांनी जाधव यांचा सत्कार करून भेट वस्तू दिल्या. उपस्थित यांचे स्वागत तुषार चिंदरकर यांनी तर प्रास्ताविक उपशाखा अधिकारी क्षमा कारेकर यांनी व सूत्रसंचालन कुमार नाडकर्णी यांनी केले.यावेळी बँक कर्मचारी स्वप्निल जाधव, दिलीप केदारी, शशिकांत गाड आणि ग्रामस्थ भाई सावंत-पटेल, राजा पारकर, प्राथनेश रेवडेकर,अजित नाडकर्णी, गुणेश कोरगावकर, चंद्रकांत फोंडके,विवेक आपटे, बिलेकाका इ.मान्यवर उपस्थित होते.