बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने 3 एप्रिल 2023 आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन सभा.

On behalf of the Bar Council of Maharashtra and Goa on 3rd April 2023 at Ambdwe Dr. Babasaheb Ambedkar Salutation Meeting.

बाबासाहेब बँरिस्टर होवून भारतात परतण्याच्या ऐतिहासीक घटनेच्या शंभराव्या वर्षाचे औचीत्य.

मंडणगड | प्रतिनिधी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व सिध्दी योग विधी महाविद्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने 3 एप्रिल 2023 रोजी आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या येज इन मधून बंरिस्टर झाले व 3 एप्रिल 1923 रोजी भारतात आले या ऐतिहासीलक घटनेला शंभर वर्षे पुर्ण होते आहेत. कायद्याचे राज्य आणि न्यायालयाचे स्वातंत्र्य या संकल्पना दृढमुल होण्यासाठी त्यांनी आय़ुष्यभर प्रयत्न केले. ज्या बँरिस्टर बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेला दिशा दिली व भारतीय राज्यघटनेची निर्मीती करुन नागरिकांना मलभुत स्वातंत्र्य दिले त्या बाबासाहेबांनी बँरिस्टर होवून भारतात येणे या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अपुर्व घटनेचे स्मरण ठेवून स्मृतीना अभिवादन करण्यासाठी 3 एप्रिल 2023 रोजी आंबडवे येथे दुपारी 4.00 वाजता आयोजीत सोहळ्याचे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अँड. मिलिंद पाटील,उपाध्यक्ष अँड. संग्राम देसाई , बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अँड. जयंत जायभाये यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा बार असोसिएनशेच अध्यक्ष अँड. दिलीप धारिया, खेड तालुका अध्यक्ष अँड. संतोष कोठारी, चिपळूण तालुका अध्यक्ष अँड. नितीन सावंत, राजापूर तालुका अध्यक्ष अँड. शशिकांत सुतार, देवरुख अध्यक्ष अँड. पुनम चव्हाण, मंडणगड तालुका अध्यक्ष अँड. मिलीद लोखंडे, दापोली तालुका अध्यक्ष अँड. विजयसिंह पावर, लांजा तालुका अध्यक्ष अँड. सदानंद गांगवण, सिध्द योग कॉलेज प्राचार्या प्रीती बोंद्रे, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, सरपंच सौ. दिपीका जाखल समाजसेवक सुदाम सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.