मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत मसदे-चुनवरे वतीने १५ व्या वित्त आयोग निधी मधून विरण बाजारपेठ येथे उभारण्यात आलेल्या वॉटर कुलरचे (पाणपोई) उद्घाटन जिल्हा बँक संचालक – बाबा परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या सुविधेमुळे उन्हाळ्यात प्रवासी, ग्रामस्थांना थंड पाण्याची सोय झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सरपंच श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे, माजी जी प सदस्य अनिल कांदळकर,
बाळा परब,विलास पांजरी, जितेंद्र परब कमलेश प्रभू, बाबू वाडकर, शर्मिका वाडकर, गुरुनाथ परब, दाजी परब व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल कांदळकर म्हणाले, यापुढे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकाभिमुख योजना राबवून विकास कामे पूर्ण होतील.