लांजा तालुका मराठा संघाचे आयोजन
लांजा | प्रतिनिधी : मराठा समाजातील नवोदित उद्योजकांसाठी बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत लांजा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे.लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीम. सोनम पवार या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या मेळाव्याला मराठा समाजातील उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे व सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी यांनी केले आहे..