सौ रुही पाटणकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

Google search engine
Google search engine

Mrs. Ruhi Patankar Adarsh Shiksha Award

माखजन|वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना व ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी ठाणे पालघर यांचे तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.नुकत्याच राजापूर येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय दत्तवाडी(डोंगर)येथे झालेल्या कोकण विभाग अधिवेशनात हे पुरस्कार विविध मान्यवरांना देण्यात आले. या कार्यक्रमात माखजन इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ रुही अमित पाटणकर यांना गुरुसखा रामनाथ दादा मोते स्मृती पुरस्कार तथा आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले.सौ पाटणकर यांनी शिक्षण क्षेत्रात घेतलेली मेहनत,अध्यापनाचे केलेले मनापासून काम याची दखल घेऊन हा पुरसाकार देण्यात आला.त्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आनंद साठे,अन्य संचालक,संस्थेचे सभासद,शिक्षण प्रेमी नागरिक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन होत आहे.