Plastic management awareness round was conducted through Lanja Nagar Panchayat
लांजा | प्रतिनिधी : प्लास्टिक व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमांतर्गत लांजा नगरपंचायतीच्या वतीने शहरातून स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी महिलांना परीसर स्वच्छता बाबत शपथ देण्यात आली. लांजा शहरातील श्रीधनी केदारलिंग मंदिर साटवली रोड ते लांजा नगरपंचायत अशी ही स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच महिलांना स्वच्छता विषयक शपथ देण्यात आली. यामध्ये ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे या विषयांचा समावेश होता. तसेच शून्य कचरा निर्माण करणाऱ्या पाककला स्पर्धेअंतर्गत कचऱ्याची निर्मिती न करता ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग तसेच घरगुती नैसर्गिक वस्तूंचा वापर करून महिलांनी पदार्थ बनवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमात लांजा व कुवे येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्वच्छता जनजागृती फेरीत लांजा नगरपंचायत उपनगराध्यक्षा सौ.पूर्वा मुळे, नगरसेवक राजेश हळदणकर, नगरसेविका सौ.मधुरा लांजेकर, कार्यालयीन अधीक्षक सौ.पल्लवी पुळकुटे, स्वच्छता पर्यवेक्षक सोनाली खैरे, प्रकल्प सहाय्यक अधिकारी रीना गुजर, सुशांत नाखरेकर, सिटी कोऑर्डिनेटर हर्षदा सावंत, प्रज्ञा जेधे,प्रज्ञा जाधव, अर्चना करंबेळे, सुनील गुरव सहभागी झाले होते.