समाज कंटकांनी आग लावल्याचा आरोप
वनविभागाच्या भूमिकेबाबतही रोष
सावंतवाडी । प्रतिनिधी : कुणकेरी जंगल परिसरात वणवा पसरला आहे. ही आग जंगल हद्दीलगत असलेल्या काजू बागायतीत पसरल्याने चार ते पाच काजू बागायतदार शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडीतील उपरलकर देवस्थान मंदिर पासून काही अंतरावर ही आग लागली आहे. समाज कंटकांकडून ही आग लावल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतरही कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. ही आग त्वरित विझविण्यात यावी अशी मागणी होत आहे.
Sindhudurg