जिल्ह्यास्तरीय निबंध स्पर्धेत श्रुती प्रथम तर साहिल द्वितीय

Google search engine
Google search engine

Shruti first and Sahil second in district level essay competition

वेंगुर्ले । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारत उज्ज्वल यश संपादन केले. वर्धमान महावीर जयंतीचे औचित्य साधून हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना वर्धमान महावीराचे तत्वज्ञान माहिती व्हावे.मानवी जीवनातील मुलभूत तत्वे विद्यार्थ्यांनी अंगिकारून आनंदी समाज निर्माण करावा हाच उद्देश या स्पर्धे मागे होता. या स्पर्धेत कु.श्रुती श्रीधर शेवडे या विद्यार्थ्यांनीने आपली विजयी घौडदौड कायम राखत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला
श्रुती शेवडे हिने या पुर्वी अनेक जिल्ह्यास्तरीय निंबध व वक्तृत्व स्पर्धेत सातत्याने यश संपादन केले आहे.तर या निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या कु.साहिल अनिल भाईडकर याने व्दितीय नंबर मिळवून या यश संपादन केले
या दोन्ही विद्यार्थ्यांना या प्रशालेच्या अध्यापिक सौ.भिसे मॅडम ,लिपीक श्री अजित केरकर आणि प्रा. वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वाळवेकर सर ,संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले याच बरोबर इतर पदाधिकारी यांनी
यशस्वी विद्यार्थ्यां व मार्गदर्शक सौ.भिसे मॅडम, प्रा.खानोलकर आणि श्री केरकर यांचे ही विशेष अभिनंदन केले आहे.
निंबध स्पर्धेतील पहिले दोन प्राप्त करणारे या प्रशालेचे आणि यशस्वी विद्यार्थ्यां व त्याचे मार्गदर्शक यांचे या कौतुकास्पद यशामुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे