“Pranalakdurg conservation in Dapoli…”
दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी येथील ऐतिहासिक प्रणालक दुर्ग येथे सह्याद्री प्रतिष्ठान दापोली विभागा मार्फत स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत पन्हाळेकाजी यांच्या सहकार्याने दोन वर्षांपासून संवर्धन कार्य सुरू आहे.
दापोलीत येणारे पर्यटक हे दापोलीतील समुद्र किनारे यांना भेट देणे पसंत करतात. काही मोजके पर्यटक हे पन्हाळेकाजी लेण्यांना भेट देतात परंतु याच ठिकाणी असलेल्या प्रणालकदुर्गाला भेट देत नाहीत. असे लालितेश दवटे यांनी सांगितले.
या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास या लेण्यांशी निगडित असून या किल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.जास्तीत जास्त पर्यटकांनी या किल्ल्याला भेट दिली पाहिजे असे मत
पन्हाळेकाजी ग्रामस्थ व समाजसेवक श्री प्रदीप जाधव यांनी व्यक्त केले.
या मोहिमेत
दापोली पासून किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला जागोजागी दिशा दर्शक फलक लावण्यात आले.
●किल्ल्यावर सूचना फलक,वास्तू दर्शक आणि लेण्यांकडे दुर्ग अवशेष फलक लावण्यात आला.
● तटबंदीवरील झुडपे काढण्यात आली.
●येणाऱ्या पावसाळ्यात बालेकिल्ल्यावरील माती दगड टाकीत पडू नये म्हणून टाकी स्वछता करून चर काढण्यात आले. ही कामे करण्यात आली असे श्री अमित भांबीड यांनी सांगितले.
मोहिमेसाठी स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र जाधव,बाळकृष्ण जाधव(पो.पा),प्रणिल जाधव,रवींद्र जाधव,बबन घाणेकर,सहदेव जाधव,सुरेश पेडणेकर,शशिकांत पेडणेकर(शा. प्र),तुकाराम काताळे,विजय जाधव,दत्ताराम दाभोळकर यांचे सहकार्य लाभले.
तसेच संस्थेचे
श्रीवर्धन,खेड,मंडणगड,पनवेल,मुंबई आणि शहापूर या विभागांचे दुर्गसेवक सहभागी झाले.अशी माहिती श्री. नंदकुमार झाडेकर आणि श्री प्रशांत कालेकर यांनी दिली.