तिच्या मदतीसाठी धावली प्राथमिक शिक्षक भारतीची मालवण शाखा!

Google search engine
Google search engine

Primary teacher Bharti’s Malvan branch ran to help her!

गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला २१ हजारांची आर्थिक मदत

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्रावण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही किडन्या निकामी झाल्याने गंभीर आजारी आहे. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख खर्च अपेक्षित आहे. सदर रक्कम कुटुंबियांना उभी करणे शक्य नाही आहे. शिक्षक भारती सदस्य श्रीम.रागिणी ठाकूर व श्री.उमेश बुकशेटवार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण यांच्यावतीने सुचिता बागवे हिस तिच्या उपचारांसाठी २१ हजार रुपये तिचे काका प्रकाश बागवे यांना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व श्रावण सरपंच श्रीम.नम्रता मुद्राळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष श्री.संतोष कोचरेकर,रागिणी ठाकूर, उमेश बुकशेटवार,कृष्णा कालकुंद्रीकर,गंगाराम पोटघन ,दिनकर शिरवलकर,संतोष आचरेकर,राजेंद्र चौधरी,तुकाराम खिल्लारे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उमेश श्रावणकर आदी उपस्थित होते. आर्थिक मदती बद्दल बागवे कुटुंबियांनी आभार मानले आहेत.