The legal experts of today’s generation should do the social work by living the thoughts of Babasaheb.
अँड. मिलिंद पाटील, अध्यक्ष ( बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा)
मंडणगड | प्रतिनिधी : आजच्या पिढीतील युवा विधीज्ञांनी वकीलीकडे केवळ व्यवसाय म्हणून न पहाता बाबासाहेबांचा विचार प्रत्यक्षात जगत, प्रचलित काळातील विषमता दुर करण्यासाठी कार्यरत रहात समाजपोयगी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष अँड. मिलिंद पाटील यांनी आंबडवे येथे आयोजीत अभिवादन सभेत केले. 3 एप्रिल 2023 रोजी डॉ. आंबेडकरांच्या बॅरिस्टर होऊन भारतात परतण्याच्या ऐतिहासीक घटनेस शंभर वर्ष पुर्ण झाली या घटनेच्या स्मृती जागवणासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व सिध्दयोग विधी महाविद्यालय खेड यांच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या सोहळ्याचे अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले संविधान निर्मात्यांच्या गावी आल्याचा सार्थ अभिमान वाटत असून घटनाकारांचे मुळ गाव असलेल्या तालुक्यात लवकरात लवकर तालुका न्यायालय चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. बाबासाहेबांच्या मुळगावी होत असलेला कार्यक्रम सर्व वकिलांकरिता मैलाचा दगड असून या ऐतिहासीक कार्यक्रमातून प्रेरणा घेत समाजातील सर्व घटकांना न्याय देता येईल या करिता आपण सार्वत्रीक प्रयत्न कारावेत असे यावेळी सांगीतले. कार्यक्रमास उपाध्यक्ष अँड. संग्राम देसाई(बार कौन्सिल ऑफ इंडिया), जयंत जायभावे, सदस्य (बार कौन्सिल ऑफ इंडिया) यांची उपस्थिती लाभली. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून अँड. विलास पाटणे उपस्थिती लाभली. कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा बार असोसिएनशेच अध्यक्ष अँड. दिलीप धारिया खेड तालुका अध्यक्ष अँड. संतोष कोठारी, चिपळूण तालुका अध्यक्ष अँड. नितीन सावंत, राजापूर तालुका अध्यक्ष अँड. शशिकांत सुतार, देवरुख अध्यक्ष अँड. पुनम चव्हाण, दापोली तालुका अध्यक्ष अँड. विजयसिंह पावर, लांजा तालुका अध्यक्ष अँड. सदानंद गांगवणे, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, सरपंच सौ. दिपीका जाखल, समाजसेवक सुदाम सकपाळ, गटविकास अधिकारी विशाल जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, जनकल्याण बँकेचे विजय खैरे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंडणगड तालुका बार असोसिएशचे अध्यक्ष अँड. मिलिंद लोखंडे यांच्या नियोजनाखाली तालुक्यातील सर्व वकीलांनी या कार्यक्रमाकरिता मेहनत घेतली.
चौकट
ऐतिहासीक दिवसाचे महत्व,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या ग्रेज इनमधून बॅरिस्टर झाले आणि 3 एप्रिल 1923 ला भारतात आले. या ऐतिहासिक घटनेला 3 एप्रिल 2023 शंभर वर्षे पूर्ण झाली. कायद्याचे राज्य आणि न्यायालयाचे स्वातंत्र्य या संकल्पना दृढमूल होण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले व न्यायव्यवस्थेला दिशा दिली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य दिले, बाबासाहेबांनी बॅरिस्टर होऊन भारतात येणे या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अपूर्व घटनचे स्मरण ठेवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.