The amount of Contributory Pension Scheme is finally Rs. P.S. class in
प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश
मसुरे | झुंजार पेडणेकर : अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम एन. पी.एस. मध्ये वर्ग करण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारतीने गेली एक वर्ष केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षकांच्या हिशोब तक्त्यातील तफावत दूर करण्यासाठी शिक्षक भारती गेले चार वर्षे सतत प्रयत्नशील होती.त्यामुळे शिक्षकांच्या जमा रकमेतील तफावती दूर झाल्या असून शिक्षकांना अद्यावत हिशोब तक्ते देऊन त्यांची सर्व रक्कम नवीन एन्. पी.एस् खाती वर्ग करण्यात आली आहे. या मागणीचा गेले वर्षभर सातत्यपूर्ण सतर्क राहून पाठपुरावा करण्यात आला.गेल्या चार वर्ष संघटनेच्या वतीने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी,मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी,मा.शिक्षणाधिकार, मा.वित्त व लेखाधिकारी,उपवित्त व लेखाधिकारी ,यांची सातत्यपूर्ण भेट घेऊन व निवेदन देऊन चर्चा करण्यात येत होती.तसेच फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनातील मागणीत ही हा विषय संघटनेमार्फत लावून धरलेला होता .तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यानी जुलै २०२२ मध्ये आयोजित केलेल्या सर्व संघटनाच्या सभेमध्येही हा विषय संघटनेमार्फत मांडण्यात आला होता.
याची मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यानी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.त्याप्रमाणे आज एन्. पी.एस् धारक शिक्षकांच्या खाती त्यांची अंशदायी ची रक्कम वर्ग करण्यात आली त्याबद्दल मा.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर साहेब ,मा.उपमुख्यकार्यकारी राजेंद्र पराडकर, मा.शिक्षणाधिकार महेश धोत्रे , मा.वित्त व लेखाधिकारी वल्लरी गावडे ,मा. उपवित्त व लेखाधिकारी श्री आरोंदेकर , शिक्षण विभाग लेखाधिकारी विनोद राणे , शिक्षण विभाग कनिष्ठ लिपिक सत्यवान सावंत यानी जे सहकार्य केले त्याबद्दल संघटनेमार्फत त्याना धन्यवाद देण्यात येत आहेत. तसेच यासाठी सदैव तत्पर राहून सहकार्य करणारे संघटनेचे कार्यालयीन सचिव दिनकर शिरवलकर यांचे विशेष आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले आहेत. हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो सोडवण्यासाठी शिक्षक भारतीने जो पाठपुरावा केला त्याबद्दल एन्. पी.एस् धारक शिक्षकांनी शिक्षक भारतीचे आभार व्यक्त केले आहेत.