कणकवलीतून आज सायंकाळी निघणार अविस्मरणीय “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”

Google search engine
Google search engine
Unforgettable “Swatantryveer Savarkar Gaurav Yatra” will leave from Kankavli today evening.

कणकवली शहरातील पटकी देवी मंदिराकडून होणार यात्रेला प्रारंभ

कणकवली मतदार संघात सर्वत्र भगवे झेंडे वीर सावरकरांचे बॅनर झळकले

आम्ही सर्व सावरकर च्या जयघोषाने आसमंत दुमदुमणार

जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, यात्रेची मोठी उत्सुकता.

संतोष राऊळ | कणकवली : कणकवली शहरातून सायंकाळी चार वाजता “स्वतंत्र वीर सावरकर गौरव यात्रा” भव्य स्वरूपात निघणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून कणकवली शहरातील पटकी देवी मंदिर येथून सायंकाळी ४ वाजता ही यात्रा वाजत गाजत हजारो सावरकर प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या वतीने समाजातील सर्व घटकांना घेऊन विविध संघटनांचा सहभाग असलेली या यात्रेची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेले आहे.यात्रेचे नेतृत्व कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे करणार असून यात्रेसाठी शिवसेना-भाजप युतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कणकवली देवगड वैभववाडीतील हजारोंच्या संख्येने जनता सहभागी होणार आहे.

जाज्वल्य राष्ट्रप्रेम,देशभक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जपली त्यांच्या प्रती सन्मान, आदर आणि गौरव व्यक्त करणारी ही अविस्मरणीय अशी गौरव यात्रा असणार आहे. ढोल ताशांचा गजर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित माहितीपट वेगवेगळ्या नेत्यांची भाषणे, वीर सावरकर यांनी लिहिलेले राष्ट्रगीते समरगीत त्याचप्रमाणे सावरकरांचा स्टॅचू पथनाट्य असा आगळावेगळा कार्यक्रम या गौरव यात्रेतून सादर केला जाणार आहे. पटकी देवी मंदिर येतुन ही यात्रा मुख्य चौकातून,एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचेल त्यानंतर व्यासपीठावरील कार्यक्रम सादर होतील.