जि.प.नूतन विद्यामंदिर-मंडणगड येथे “वार्षिक स्नेहसंमेलन” रंगबहार-2023″ जल्लोषात संपन्न

Google search engine
Google search engine

“Annual Snehasamelan” Rangbahar-2023″ was concluded with jubilation at G.P. Nutan Vidyamandir-Mandangad

मंडणगड | प्रतिनिधी :  “नूतन विद्यामंदिर-मंडणगड” ता.मंडणगड या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम 29 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे औचित्य साधून चालू शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शाळेला अधिकतम प्रमाणात आर्थिक सहकार्य करणाऱ्या आजी-माजी दानशूर व्यक्तींचे स्वागत व सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नारायण कोकाटे यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. जि.प.माजी उपाध्यक्ष संतोष गोवळे यांनी देखील बालकलाकारांना शुभेच्छा दिल्या.मंडणगड प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी. राजेंद्र रेवाळे यांनी आपल्या मनोगतातून शाळेची सखोल माहिती सांगितली.शाळेचा प्रत्येक क्षेत्रातील चढता आलेख पाहून शाळा कमिटी आणि शाळेच्या आजी-माजी शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. शाळा परिसरातील अंगणवाड्या आणि शाळा अशा एकूण जवळ-जवळ 28 नृत्याविष्कारांतुन महाराष्ट्र संस्कृती चे दर्शन नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमास शहरातील दर्दी रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली होती.

शाळेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक गोविंद मुंढे यांच्या यूट्यूब लाईव्ह संकल्पनेमुळे अनेकविध ठिकाणी असलेल्या शाळेच्या चाहत्या रसिक वर्गाला कार्यक्रमाचा लाईव्ह आनंद घेता आला.शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या एकत्रित पी.पी.टी. चे सादरीकरण करण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या ऑनलाईन शाळा प्रवेशाच्या लिंक चे देखील नगरपंचायत मंडणगड च्या नगराध्यक्षा सौ सोनल बेर्डे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. केंद्रातील तसेच तालुक्यातील अनेक शिक्षकांचे,सर्व पालक वर्गाचे,शालेय सर्व समित्यांचे,शाळेचा चाहता रसिक वर्ग अशा वेगवेगळ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कार्यक्रमाप्रसंगी अनमोल सहकार्य लाभले.स्वागत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक शिवप्रसाद हात्ते यांनी केले तर स्वागतगीत सादरीकरण सुहास रांगले आणि श्री.किशोर आंधळे यांच्या साथीने शाळेतील विद्यार्थिनींनी उत्तम प्रकारे केले.शाळेच्या जेष्ठ मार्गदर्शक शिक्षिका सौ.सायली रांगले उपशिक्षिका सौ.वर्षा जाधव, श्रीम.सुयोगा पवळ, श्रीम.निर्मला तळणे, श्रीम.शुभांगी पावडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या निवेदिका म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडली.शाळेचे पदवीधर शिक्षक दत्तात्रय जाधव,उपशिक्षक विष्णू चोथवे, महेश सुपेकर यांनी देणगी विभाग जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली.क्यूआर कोड च्या माध्यमातून देणगी स्विकारणारी तालुक्यातील पहिली शाळा ठरली.रसिक प्रेक्षकांचा देणगी मध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचा शिक्षक वर्ग,सर्व पालक वर्ग,शाळेच्या सर्व समित्या,ग्रामस्थ या सर्वांची मेहनत तर होतीच त्याचबरोबर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.सायली दिवेकर, उपाध्यक्षा सौ.स्मिता अबगुल, शिक्षणतज्ञ दिनेश सापटे, सदस्य प्रविण भुवड, सदस्या सौ.मेघा सुगदरे, सौ.अपूर्वा साळवी, सौ.मेघना पोस्टुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.शाळेने केलेल्या सूक्ष्मातिसूक्ष्म नियोजनामुळे तालुकाभरातून विविध माध्यमाद्वारे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शाळेचे गोड कौतुक होत आहे.