For budding entrepreneurs of the Maratha community, it should be passed
लांजा येथील लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झाला मेळावा
लांजा तालुका मराठा संघाचे आयोजन
लांजा | प्रतिनिधी : मराठा समाजातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेउन उद्योजक बना, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल पवार यांनी लांजा येथे केले. मराठा समाजातील नवोदित उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा बुधवारी ५ एप्रिल रोजी लांजा येथील लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी सोनल पवार बोलत होत्या. लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल पवार या उपस्थित होत्या .तसेच व्यासपीठावर लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, उद्योजक जयवंत विचारे, संघटनेचे उपाध्यक्ष सतीश राणे, शरद चव्हाण ,खजिनदार प्रकाश जाधव,सरचिटणीस विजय पाटोळे हे मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
या मेळाव्यात श्रीमती सोनल पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली. या मेळाव्याला लांजा तालुक्यातील मराठा समाजातील नवतरुण उद्योजक आणि तरुण उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा संघाच्या पदाधिकारी सदस्य यांनी मेहनत घेतली.