दोणवली येथील श्री नवलाई-कालकाई ग्रामदेवतेची ९ रोजी जत्रा

Google search engine
Google search engine

Fair on 9th of Shri Navalai-Kalkai village deity of Donvali

संतोष कुळे  | चिपळूण : श्री देवी नवलाई कालकाई देवी ग्रामदेवता दोणवली या ग्रामदेवतेचा जत्रा उत्सव रविवार दि. ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे या यजमान ग्रामदेवतेला भेटण्यासाठी मजरेकौंढर, कात्रोली देऊळवाडी आणि गोंधळे या ग्रामदेवतांचे आगमन होणार आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमा पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते. भक्तांच्या आनंदाला उधाण येते. रात्रभर देवीच्या पालख्या घेऊन इतर गावांमध्ये भेटीसाठी जाणं आणि पुन्हा त्या वाजतगाजत आपल्या गावी आणणं यासाठी सर्व गावकरी मिळून प्रयत्न करीत असतात. चिपळूण तालुक्यातील दोणवली गावची ग्रामदेवता देवी नवलाई, कालकाई देवीचा जत्रा उत्सव सुद्धा रविवारी ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या ग्रामदेवतेला भेटण्यासाठी मजरेकौंढरची ग्रामदेवता कडदोबा-कालकाई, गोंधले गावची ग्रामदेवता श्री मानाई देवी आणि कात्रोली देऊळवाडीची ग्रामदेवता श्री काळीश्री कालकाई देवी या ग्रामदेवता दोणवली यजमान ग्रामदेवतेला भेटण्यासाठी येणार आहेत. याची जय्यत तयारी दोणवली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. रविवारी रात्री पालख्यांचे आगमन झाल्यानंतर रात्री ११ वाजता सर्व ग्रामदेवतांचे विधिवत पूजा केली जाईल. त्यानंतर नियोजनाप्रमाणे यजमान देवतेला आलेल्या ग्रामदेवता भेटतील. रात्री १२ वाजता करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ग्रामस्थांनी श्री वासिक बाबा नाट्य नमन मंडळ गवाणे रेवाळेवाडी तालुका लांजा येथील नमनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या जत्रा उत्सवला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीदेवी नवलाई कालकाई ग्रामदेवता मंडळ दोणवली यांनी केले आहे.