गुहागरात उद्यापासून रंगणार कुणबी प्रीमिअर लीगचा थरार

The thrill of the Kunbi Premier League will be played in Guhagar from tomorrow

गुहागर | प्रतिनिधी : कुणबी समाजोनत्ती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर संलग्न कुणबी युवा (ग्रामीण) अंतर्गत कुणबी क्रीडा समिती गुहागर आयोजित कुणबी प्रीमिअर लीगचा थरार उद्यापासून तालुक्यातील शीर येथे सुरू होत आहे.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023 या दुसऱ्या पर्वाला शुक्रवार दिनांक 7 पासून सुरुवात होत असून दिनांक 9 रोजी या पर्वाची सांगता होणार आहे.स्पर्धेच्या युगात युवक टिकून रहावा आणि अष्टपैलू खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी तसेच कुणबी बांधवांना एकत्रित करण्यासाठी ही स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. या स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.