कोकण कट्ट्याचे नामवंत चित्रकार जलरंगातून साकारणार निसर्गरम्य दापोली

Google search engine
Google search engine

The famous painter of Konkan Katta will paint the scenic Dapoli in water color

 

कोकणातील अभिजात सौंदर्याची सर्वानाच भूरळ पडते. कोकण चे सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने यावेत व त्यातूनच कोकणाचा पर्यटन विकास साधला जावा यासाठी कोकण कट्टा – विलेपार्ले, मुंबई या संस्थेद्वारे निसर्गचित्र रेखाटन हा उपक्रम राबविला जातो. दर वर्षी कोकणातील विविध ठिकाणी जाऊन काही नामवंत व्यवसायिक चित्रकार आपल्या कुंचल्याने हा निसर्ग काही क्षणांत पेपरवर जिवंत करतात. या वर्षी हे नामवंत चित्रकार दापोलीत येत आहेत. दापोलीच्या नयनरम्य निसर्गाची उधळण शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 ते 8 एप्रिल 2023 रोजी दापोली तालुक्यामध्ये विविध ठिकाणी होणार आहे.

दापोली बाजार पेठ, एस टी डेपो, केळस्कर नाका, मच्छी मार्केट, बुरोंडी,दाभोळ, कोळथरे, केशवराज मंदिर, मुरुड, आंजर्ले, पाजपंढरी, हर्णे ,चंडिका मंदिर अश्या अनेक ठिकाणची निसर्गचित्रे काढली जाणार आहेत.

‘कोकण कट्टा’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री अजित पितळे यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. या सर्व चित्रांचे भव्य प्रदर्शन मुंबईत भरवले जाणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन श्री अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार कदम, जितू गायकवाड आणि मंगेश राणे यांनी केले आहे. दापोलीतील अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला मदत करून मोलाची साथ दिली आहे.

विशेष सहकार्य :-
आजोबा ग्राहक परिवार :- श्री संतोष जाधव
निसर्ग पर्यटन :- श्री संजय नाईक
नामवंत शिल्पकार :- श्री संजय महाडिक
साई गणेश ट्रॅव्हल्स :- श्री दीपक नाईक
सन्माननीय दीपक खेडेकर
सन्माननीय श्री भालचंद्र मुसळणकर
सन्माननीय श्री भगवान घाडगे (माजी सभापती)