माजगाव नाला परिसरातील पन्नास वर्षीय महिला बेपत्ता

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । वार्ताहर :

माजगाव नाला येथे वास्तव्यास असलेली पन्नास वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. अनिता अजित राजपूत (मूळ रा. रत्नागिरी), असे तिचे नाव असून ती २६ ऑक्टोबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली.

दरम्यान, तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा कोठेही थांगपत्ता न लागल्याने अखेर तिच्या पतीने सावंतवाडी पोलिसांत बेपत्ताची खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Sindhudurg