आचरा | अर्जुन बापर्डेकर : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरीय ग्रामिण गुणवत्ता धारक असलेल्या आचरा पिरावाडी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कुमार मृणाल विठ्ठल धुरी याचा हनुमान जयंती च्या औचित्यावर तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे अध्यक्ष दीनानाथ धुरी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळीउपाध्यक्ष श्री मुरलीधर कोळंबकर मालवण तालुका गाबित समाज अध्यक्ष डॉ प्रमोद कोळंबकर ग्रा प सदस्य चावल मुजावर सदस्य सल्लागार श्री गिरिधर सारंग श्री मित्र रामचंद्र कुबल आचरा पोलीस पाटील आणि मृणालचे वडील विठ्ठल धुरी आदी उपस्थित होतो.