कणकवली : तालुक्यातील तरंदळे गावातील जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जि. प. माजी अध्यक्ष तथा भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते 05 एप्रिल, 2023 रोजी कुंदेवाडी विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ संपन्न करण्यात आला. गणेश पूजन गावातील ज्येष्ठ सूर्यकांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. सरपंच सुशिल विजय कदम यांनी प्रास्ताविक करीत असताना तरंदळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विकास कामांना निधी दिल्याबदल आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
आपल्या प्रास्ताविकामध्ये सरपंच सुशिल कदम म्हणाले की, आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे तरंदळे नळ योजनेसाठी जलजीवन योजने अंतर्गत 98,25,300 रुपये मंजूर करण्यात आले. तरंदळे मुख्य रस्ता ते तरंदळे कुंदेवाडी सावडाव खलांतरवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंदाजित 3 कोटी 29 लाखाचा निधी मंजूर करून दिला. तरंदळे कुंदेवाडी हडकर घर ते देवूलकर घर रस्ता डांबरीकरण करणे 5 लाख रुपये निधी मंजूर करून दिला. तरंदळे भाडेखिंड ते जाणवली हद्दीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख रुपये निधी मंजूर करून दिला. तरंदळे कुंदेवाडी येथे स्मशान शेड बांधणे 5 लाख रुपये निधी मंजूर करून दिला. जिल्हा परिषद शाळा तरंदळे नंबर 1 दुरुस्त करणे 10 लाख निधी मंजूर करून दिला. तरंदळे जुनी फौजदार वाडी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख निधी मंजूर करून दिला. आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही सर्व कामे मिळाली त्याबद्दल पूर्ण गावाकडून त्यांचे सरपंच सुशील कदम यांनी आभार मानले.
भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देवून करण्यात आलं. तसेच भाजप शक्तीकेंद्र प्रमुख संदीप सावंत, राजेश हीर्लेकर यांचं सुध्दा स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आलं. गोट्या सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही कामाचा दर्जा ढासळू देणार नाही. कामाचा दर्जा हा चांगल्या प्रकारचा, टिकावू असावा असा इशारा दिला. सरपंच सुशिल कदम यांनी सर्वांचे आभार मानले. ह्यावेळी माजी सरपंच सुधीर सावंत, माजी सरपंच राजेश फाटक, उपसरपंच शुभावली सावंत, ग्रामपंचायत सदस्य नेहा घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील दत्त जाधव, माजी उपसरपंच संदेश सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य देवा रावले आणि तरंदळे गावातील रहिवासी, आजी-माजी पदाधिकारी, तरंदळे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.